No Comments

भोलानाथ । पाऊस पडेल काय?

सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥ भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय लाडू हळुच घेताना आवाज होई काय भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ॥१॥ भोलानाथ ! भोलानाथ !! खरं सांग एकदा आवठवड्यात रविवार येतील कां रे तीनदा भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ॥२॥ भोलानाथ ! उद्या आहे गणिताचा पेपर पोटात माझ्या कळ येऊन दुखेल करे ढोपर भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ॥३॥ शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥ सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय
गीतकारः मंगेश पाडगावकर
You might also like

More Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fill out this field
Fill out this field
Please enter a valid email address.