No Comments

स्थानबध्द वुडहाऊस

16 फेब्रुवारी 1975 . च्या सकाळच्या गाडीने पुण्याहून मुंबईला जायला निघालो होतो. वर्षानुवर्षे वुडहाऊस हा माझा प्रवासातला सोबती आहे . त्याची पुस्तके शिळी व्हायलाच तयार नाहीत . माझ्या प्रवासी बॅगेत इतर कोणतीही पुस्तके असली तरी वुडहाऊस हवाच . तसा घेतला . तेवढ्यात दाराच्या फटीतून ` सकाळ ` सरकला . पहिल्या पानावर वुडहाऊसच्या निधनाची बातमी . एका हातात कधीही न मरणारा वुडहाऊस आणि दुसऱ्या हाता याण्णवाव्या वर्षी वुडहाऊस मरण पावल्याची बातमी सांगणारा ` सकाळ . ‘ त्या क्षणी मला वुडहाऊसच्या एका उद्गाराची आठवण झाली . लेओनारा ‘ ही त्याची अत्यंत लाडकी एकुलती एक मुलगी वारल्याची बातमी ऐकल्यावर त्रेस्ष्ट वर्षांचा वुडहाऊस उद्गारला होता ,
” आय थॉट शी वॉज् इम्मॉर्टल. ” आपली लाडकी लेओनारा आणि तिचा मृत्यून ह्या दोन घटना , वुडहाऊच्या स्वप्नातही कधी एकत्र आल्या नव्हत्या. `मला वाटलं होतं की ती अमर आहे’ ह्या एवढ्या उद्गारात जगात अपत्यवियोगाच्या वेदना भोगाव्या लागलेल्या आईबापांच्या मनावर बसणाऱ्या पहिल्या निर्घृण घावाला एखाद्या शोक – सूत्रासारखी वाचा फुटली आहे .वुडहाऊच्या निधनाची वार्ता ऐकल्यावर जगातल्या त्याच्या लक्षावधी वाचकांनीही हेच म्हटले असेल की , ` अरे , आम्हांला लाटलं होतं की तो अमर आहे .! ‘वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर लिहिलेल्या त्याच्या कादंबरीतही वाचकाला खळाळून हसवायचे तेच सामर्थ्य होते . वुडहाऊसने लिहीत जायचे आणि वाचकांनी हसत हसत वाचायचे ही थोडीथोडकी नव्हे , सत्तरएक वर्षांची परंपरा होती . त्याच्या लिखानात लेखकाच्या वाढत्या वयाचा जरासाही संशय यावा असी ओळ नव्हती . कुठे थकवा नव्हता . सत्तरएक वर्षापूर्वी मांडलेला दंगा चालू होता . वुडहाऊस नसलेल्या जगातही आपल्याला रहावे लागणार आहे हा विचारच कुणाला शिवत नव्हता . पेल्हम ग्रेनव्हिल वुडहाऊस नावाचा 15 ऑक्टोबर 1881 रोजी जन्माला आलेला हा इंग्रज आपल्या लिखानाचा बाज यत्किंचितही न बदलता रोज आपल्या टेबलापाशी बसून कथा – कादंबऱ्या लिहित होता . पेल्हम ग्रेनव्हिल हे त्याचे नाव जरासे आडवळणीच होते . त्यामुळे त्याचे आडनावच अधिक लोकप्रिय झाले . ` बारशाच्या वेळी बाप्तिस्मा देणाऱ्या पाद््याचा हे असले नाव ठेवण्याबद्दल मी रडून – ओरडून निषेध करतोय हे कोणाच्याच लक्षात आले नाही ,ही त्या नावानर स्वतः वुडहाऊसचीच तक्रार आहे . जवळची माणसे त्याला ` प्लम ‘ म्हणत .

प्लमच्या कथा – कादंबऱ्यांतील वातावरणाचा बदलत्या समाजपरिस्थितीशी सुतराम संबंध नव्हता . त्याची त्याने दखलही घेतली नाही . आणि नवल असे की , त्याच्या वयाच्या नव्वद – ब्याण्णवाव्या वर्षी लिहिलेल्या पुस्तकाचा खपही दशलक्षांच्या हिशेबात होत होता . त्याच्या लिखाणात आधुनिक पाश्चात्य लोकप्रिय कादंबऱ्यांतून आढळणारी कामक्रीडांची वर्णने नव्हती , खून – दरोडे नव्हते , रक्त फुटेस्तोवरच्या मारामाऱ्या नव्हत्या . होते ते एक जुने इंग्लंड आणि काळाच्या ओघाबरोबर वाहून गेलेला त्या समाजातला एक स्तर . ते इंग्लंडही प्लमनने अनेक वर्षांपूर्वी सोडले होते . अमेरिकेत न्यूयॉर्कजवळ येऊन स्थायिक झाला होता . कुटुंबात तो आणि त्याच्याहून चार वर्षांनी लहान असलेली त्याची प्रेमळ , सुदक्ष सहचारिणी एथेल , काही कुत्री आणि मांजरे . लेखनावर लक्षावधी डॉलर्श मिळत गेल्यामुळे लॉग आयलंडवरच्या रेमसेनबर्ग नावाच्या टुमदार उपनगरात राहायला एक सुंदर बंगली . भोवताली काही एकर बाग.  त्यात गर्द वनराई. वनराईतून पळणाऱ्या पायवाटा.

पुढे वाचा

You might also like

More Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fill out this field
Fill out this field
Please enter a valid email address.