सखाराम गटणे

“सर, हे पेढे–” सखाराम गटण्याने माझ्या हातात एक पुडी ठेवली.

“कसले रे?”

“प्राज्ञ परीक्षेत पास झालो.”

“छान!” प्राज्ञ परीक्षेची पातळी झटकन माझ्या लक्षात आली. “किती पर्सेंट मार्क मिळाले?”

“अजून गुणांची टक्केवारी कळली नाही. कळल्यावर सांगेन. पण निदान पासष्ट प्रतीशत तरी मिळावेत.”

सखाराम गटणे प्राज्ञ मराठी बोलतो. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यात भिजलेले एखादे दिनवाणे कुत्रे उचलून आपण घरी आणावे, तसाच या गटण्याचा आणि माझा योग आला. ज्यांच्याकडे पाहिले म्हणजे अतीव करूणा खेरीज दुसरी कोणतीही
भावना जाग्रूत होत नाही अशा कारूण्यभजनांपैकी तो एक आहे. बाकी माणसे तरी चेह-यावर काय काय भाव घेऊन जन्माला येतात! कूणी सदैव अनाथालयाची वर्गणी मागायला आल्यसारखा, कुणी नुकतीच बस चुकल्यासारखा , कुणी सदैव आश्र्चर्यचकित, कुणी उगीचच अंतराळात, तर कुणी निष्कारण कपाळावर आठ्यांचे उभे गंध लावून.सखाराम गटणेच्या चेह~यावर हवा गेलेल्या फुटबॉलचा भाव आहे. त्याचे प्रथम दर्शन झाले तेदेखील त्याच भावात. वास्तवीक हा मुलगा माझा कोणीही नव्हे. माझ्या एका व्याख्यानानंतर ह्याची आणि माझी ओळख झाली. हा त्या वेळी मॅट्रीकच्या वर्गात होता. अर्ध्या विजारीत पांढरा सद्रा खोचलेला, त्याला नाकासमोर गांधीटोपी घातलेला, लहानसेसे भावशुन्य डोळे, काळा रंग, वेडेवाकडे दात- अशा थाटात हा मुलगा त्या हॉलच्या दारात उभा राहिला होता. मी हारतुरे घेऊन बाहेर आलो आणि त्याच्यावर नजर गेली. त्याने अत्यंत आदराने मला नमस्कार केला.

“स्वाक्षरी—” आपली वही पुढे करीत तो म्हणाला.

“छे छे, मी स्वाक्षरीबिक्षरी देत नाही.” मी उगीचच टाफरलो.

“जशी आपली इच्छा–”

त्याने दोन्ही हात जोडुन मला नम्स्कार केला. अगदी देवाला नमस्कारकरावा तसा. दुस-या एखाद्याने मला तसला नमस्कार केला असता तर मी चिडलोच असतो. पण सखाराम गटण्याचा नमस्कार इतका प्रामाणिक होता की, तो नमस्कार मला कुठेतरी जाऊन लागला. स्वाक्षरी नाकारण्याचा माझा हा काही पहीला प्रसंग नव्हता.वास्तविक मी स्वाक्षरी नेहमीच नाकारतो असे नाही. पण कधीकधी छ्योट्याछ्योट्या पोरांपुढे उगीचच शिष्टपणा करायची हुक्की येते. स्वाक्षरी देण्यात अर्थ नाही हे खरे; पण न देण्यातही काही खास अर्थ आहे असे नाही. सखारामगटणे कोप-यात उभा होता. तेवढ्यात संस्थेचे चिटणीस एक मोठे रजिस्टर घेऊन माझ्यापुढे आले.

“संस्थेला भेट देण्या-या सर्व थोरामोठ्यांच्या हात आम्ही सह्या घेतो. पुण्यातल्या पुण्यात असून आपल्या भेटीचा स्योग असा आजच येतोय.”

मी ते रजिस्टर चाळू लागलो. त-हेत-हेच्या लोकांनी संस्था पाहून संतोष व्यक्त केला होता. मीदेखील असंतोष व्यक्त करावा असे काहीच घडते नव्हते, त्यामुळे दोनचार ओळीत संतोष व्यक्त केला. त्यानतंर आर्य्कारी मंडळाच्या सभासदांबरोबर
चहापान (ग्लूको बिस्कीट, चिवडा आणि केळी!!) झाले. सभासंदाचा माफक विनोदही सहन करीत होतो. पण खिडकीबाहेर आपली वही घेऊन उभा असलेला सखाराम गटणे मला उगीचच अस्वस्थ करायला लागला होता. अगदी अनिमिष उभा असलेला तो चार-साडेचार फूट उंचीचा जीव–एखादी केरसूणी ठेवावी तसा राहीला होता. त्या मुलाकडे आता पाह्यचे नाही असे दहाबारा वेळा ठरवले. पण हट्टी असह्य झाले आणी मी चिटणीसांना त्याला बोलावून घ्यायला सांगितले.

“कुणाला? सख्याला?” चिटणीस आश्चर्याने म्हणाले.

“मला त्याचं नाव ठाऊक नाही. प्ण तो तिथे उभा आहे तो–”

“सख्याच तो. अरे ए गटण्या–“इतक्या लाबूंनदेखील सखाराम गटण्याचे दचकणे मला दिसू शकले, इतक्या जोरात तो दचकला. एखाद्या अपराध्यासारखा तो माझ्यासमोर उभा राहीला.

“काय नाव तुझं बाळ?” मी आवाजात जमेल तितका मऊपणा आणित विचारले.

“सखाराम आप्पाजी गटणे.”

“अक्षर झकास आहे बंर का ह्याचं! आमच्या व्याख्यानमालेच्या जाहिराती, बोर्डहाच लिहीतो. वडलांचं साइनबोर्डपेंटरचं दुकानच आहे, आप्पा बळवतं चोकात.””अरे, तुझं अक्षर इतकं झकास आहे मग स्वाक्ष-या कशाला गोळा करतोस?” ह्यात इतकं खास मोट्याने हसण्यासारखे नव्हते, पण मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद हसले. “कोणाकोणाच्या सह्या गोळा केल्या आहेस बघूं—”

“मी फक्त साहित्यिकांच्याच स्वाक्ष-या घेतो.” स्वाक्ष-यांचे पुस्तक माझ्या हातीदेत सखाराम गटणे म्हणाला.

मी त्याचे स्वाक्ष-यांचे पुस्तक चाळू लागलो. प्र्त्येक साहित्यिकाच्या लिखाणातून एक-एक वाक्य निवडून काढून गटण्याने त्याखाली त्या त्या साहित्यिकाची सही घेतली होती. मी शेवटले माझे पान उघडले. तिथल्या वाक्याखाली सही नव्हती.

पुढे वाचा

You might also like
Tags: marathi, marathi sahitya, pula, pula deshpande, sahitya

More Similar Posts