Posts by admin

पप्पा सांगा कुणाचे ?

ल ल्ला लला ललला, ल ल्ला लला ललला पप्पा सांगा कुणाचे ? पप्पा माझ्या मम्मीचे !मम्मी सांगा कुणाची ? मम्मी माझ्या पप्पांची ! इवल्या इवल्या घरट्यात, चिमणा चिमणी राहतात चिमणा,…

फू बाई फू

फू बाई फू, फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू आत पोकळ, बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळूम्हतारपणी नवरा केला तोही पोरखेळू माय-लेकी गोष्टी सांगे त्यांची प्रीत मोठीलुगडं सोडून देऊ लागली जावयाच्यासाठी…

फिटे अंधाराचे जाळे

फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाशदरीखोऱ्यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश रान जागे झाले सारेपायवाटा जाग्या झाल्यासूर्य जन्मता डोंगरीसंगे जागल्या साऊल्याएक अनोखे लावण्य आले भरास भरास दंव पिऊन नवेली झाली गवताची…

तुझे गीत गाण्यासाठी

तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे शुभ्र तुरे माळुन आल्या निळ्या निळ्या लाटारानफुले लेवुन सजल्या या हिरव्या वाटाया सुंदर यात्रेसाठी मला जाउ…

तुझ्या गळा, माझ्या गळा

तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळाताई, आणखि कोणाला ?चल रे दादा चहाटळा ! तुज कंठी, मज अंगठी !आणखि गोफ कोणाला ?वेड लागले दादाला !मला कुणाचे ? ताईला ! तुज…

तुला न कळले

तुला न कळले, मला न कळले कसे प्रीतिचे धागे जुळले ! ते डोळ्यांचे पहिले मीलनते पहिले स्मित, ते संवेदनशब्दाहुन ते गोड मुकेपणकसे कळीचे फूल उमलले ? थोडी लज्जा, थोडी भीतीओढ…

तिन्ही सांजा सखे मिळाल्या

तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला आजपासुनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा चक्रवाल हे पवित्र, ये जी शांत गंभीर निशा त्रिलोक गामी मारुत, तैशा…

राजा ललकारी अशी दे

राजा ललकारी अशी दे हाक दिली साद मला दे कुंकवाचा माझा धनी बळ वाघाचं आलंयाभरलेल्या मोटंवानी मन भरून गेलंया ओढ फुलाला वाऱ्याची जशी खूण इशाऱ्याची माझ्या सजनाला कळू दे सूर…

रेशमाच्या रेघांनी

रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीलाहात नगा लावू माझ्या साडीला ! नवी कोरी साडी लाखमोलाचीभरली मी नक्षी फूलवेलाचीगुंफियले राघूमोर राघूमोर जोडीला हात नगा लावू माझ्या साडीला ! जात…

उपास (बटाटयाची चाळ)

बटाट्याच्या चाळीत लपून म्हणून काही राहत नाही! अण्णा पावशांच्या मुलींच्या कुंडल्या त्यांनी खणातून केव्हा काढल्या, गुपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमण बिल्डिंगमधल्या उकिडव्यांच्या घरी केव्हा नेल्या, ही गोष्ट पावशीण-…

आहे मनोहर तरी..

हे आत्मचरित्र नाही.

आठवणींच्या प्रदेशातली ही स्वेर भटकंती. पाखरांसारखी क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर ,कुठूही. दिशाहीन. पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत केलेली.

आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेली माणसे यात नाहीत. म्हणजे त्यांना मी विसरले असे नव्हे. पण या विशिष्ट भटकंतीत ती भेटली नाहीत इतकेच. आणि जी भेटली, तीही त्या त्यासंदर्भात भिडली तितकीच इथे उमटली. त्यांचेही हे संपूर्ण चित्र नव्हे.

पाण्यात ओढस लागण्याचे प्रसंग आयुष्यात सतत येत असतात. ही स्थळातून जळात आणि जळातून स्थळात जाण्याची ओढ (की खोड?) टागोरांनाही होती असे त्यांनी म्हटलेय. मग माझ्यासारख्या सामान्यांची काय कथा ?

प्रत्येकाने स्वतःच्या शालेय जीवनात आपण पुढे कोण होणार यावर एकतरी निबंध लिहिलेला असणारच. स्वतःचे ते आदर्श चित्र निबंधाच्या वहीतच राहते. पुढे कधीतरी प्रौढवयात आपल्यातले ते नार्सिससचे फूल दरवळायला लागले की कालप्रवाहाच्या सतत हलणाऱ्या पाण्यात दिसणारे स्वतःचे प्रत्यक्ष प्रतिबिंब आणि ते वहीतले चित्र यांचे काहीतरी नातेजाणवते का ?

अशा अनेक प्रश्नांचा हा आलेख.आमच्या संसारातल्या सततच्या धावपळीतून गेल्या चार-पाच वर्षात अधून मधून वेळ मिळेल तसे, थोडेथोडे तुकडया तुकडयांनी केलेले हे लिखाण. कोणतीही योजना न आखता केलेले. त्यामुळे सुरूवातीचा मूडही अधूनमधून बदलणे स्वाभाविकच आहे.

एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकेल सांगता येत नाही.

कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे जलद भरभरून येतात आणि आकाश धुऊन स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रूपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळी च रांगोळी. धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर नक्षत्र.


डौल मोराच्या मानाचा

जीवा-शीवाची बैल जोडं, लावील पैजंला आपली कुडं  डौल मोराच्या मानाचा रं, डौल मानाचायेग रामाच्या बानाचा रं, येग बानाचातान्या-सर्जाची हं नाम जोडी पुना होवीस हाती घोडी, माझ्या राजा रं धरती आबाळाची…