Posts by admin

महाप्रलयाची कथा

यादवांच्या नाशाची कथा ऐकल्यावर राजा जनमेजयाला महाप्रलयाची माहिती ऐकावी अशी इच्छा झाली. तेव्हा वैशंपायन ऋषी म्हणाले, “महाप्रलयाचा अनुभव घेणारे या त्रिभुवनात फक्त मार्कंडेय ऋषी आहेत. त्यांनी महाप्रलयाची हकिगत ब्रह्मदेवाला सांगितली.…

यादवांच्या नाशाची कथा

ऋषींना किती ज्ञान असते, त्याची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी श्रीकृष्णपुत्र सांब यास स्त्रीवेश देऊन, पोट वाढवून गरोदर स्त्रीचे सोंग दिले व ऋषींपुढे उभे करून या ’स्त्रीला मुलगा होणार की मुलगी?’ असे…

उषा-अनिरुद्ध विवाह

उषा ही बलीचा पुत्र बाणासुर याची कन्या होय. बाणासुर महान शिवभक्त होता. त्याने शंकराकडून आपणास एक सहस्र हात असावेत, असा वर मागून घेतला. बाणासुर नंतरही नित्यनेमाने शिवपूजा करीत असे. त्यानंतर…

वज्रनाभ राजाची कथा

कश्‍यप नावाचे महातपोनिधी ऋषी होते. इंद्र हा त्यांचाच पुत्र. कश्‍यपांची एक पत्नी दिती हिला वज्रनाभ व सुनाभ अशी दोन मुले होती. दोघेही अत्यंत शूर व शक्तिशाली. मेरू पर्वतावर वज्रपुरी नावाची…

कोल्हा आणि वानर

एकदा, जनावरांचा राजा सिंह मरण पावला. तेव्हा दुसरा राजा शोधण्यासाठी प्राणी एकत्र जमले. तेव्हा वानराने वेडयावाकड्या नकला करून प्राण्यांना हसविले व युक्तीने तो राजा झाला. कोल्ह्यला याचा फार राग आला.…

कोल्हा आणि कोंबडा

एका शेतकर्‍याने कोल्ह्याला पकडण्यासाठी एक सापळा लावून ठेवला होता. एके दिवशी त्यात एक लठ्ठ कोल्हा सापडला. त्याला अडकलेले एका कोंबड्याने पाहिले व तो हळूहळू त्या सापळ्यापाशी आला आणि कोल्ह्याकडे बघत…

जुने झाड उपटून पुन्हा लावले

एका शेतकर्‍याच्या दारात सिताफळांचे मोठे झाड होते. त्यास खूप गोड आणि मधुर फळे येत. एके दिवशी त्याने त्यातली काही फळे आपल्या मालकाला नेऊन दिली. त्याला फळे इतकी आवडली की, त्याने…

गाढव आणि लांडगा

एकदा एक गाढव रानात भटकत होते. फिरता फिरता त्याच्या पायाला एक काटा बोचला. तो काटा काही त्याला काढता येईना. तेवढ्यात तिकडून एक लांडगा येताना त्याला दिसला. गाढव नम्रपणे त्याला म्हणाले,…

दोन कोंबडे

एकदा एका उकीरड्यात दोन कोंबड्यांचे युद्ध जुंपले. एका कोंबड्याने दुसर्‍या कोंबड्याला खूप जखमी केले. त्या कोंबड्याला आपल्या कर्तबगारीबद्दल इतका गर्व वाटला की, एका खोपटावर बसून ‘मी लढाई जिंकली’, ‘मी लढाई…

धनगर व्यापारी झाला होता

एक धनगर समुद्राकाठी बसून मेंढ्या चारीत असता समुद्र पाहून फार मोहीत झाला. तेव्हा समुद्र अगदी शांत होता व त्यावर गलबते फिरत होती. ते पाहून आपणही समुद्रात व्यापार करावा असे त्यास…

देव आणि प्रवासी

एकदा एक मनुष्य प्रवास करीत असता, त्याच्या मनात देवाची थट्टा करावी असे आले व त्याने आपल्याला काय मिळेल त्याचा अर्धा हिस्सा देवास देऊ, असा नवस केला. पुढे दुसर्‍या प्रवाशाची एका…

देव आणि नास्तिक मनुष्य

एकदा एक नास्तिक मनुष्य देवाची खोडी करण्यासाठी त्याच्याकडे गेला. त्याने आपल्या हातात एक चिमणी लपवून ठेवली होती. तो देवाला म्हणाला, ‘हे देवा, माझ्या हातातली वस्तु जिवंत आहे की मृत ते…