त्या तिथे, पलिकडे, तिकडे
माझिया प्रियेचे झोपडे !
गवत उंच दाट दाट
वळत जाइ पायवाट
वळणावर अंब्याचे
झाड एक वाकडे
कौलावर गारवेल
वाऱ्यावर हळु डुलेल
गुलमोहर डोलता
स्वागत हे केवढे !
तिथेच वृत्ति गुंगल्या
चांदराति रंगल्या
कल्पनेत स्वर्ग तो
तिथे मनास सापडे
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – मालती पांडे
चित्रपट – लाखाची गोष्ट (१९५२)

