एक शाळकरी मुलगा होता . त्याला एका वडीलधाऱ्या व्यक्तीने जगाच्या नकाशाचे तुकडे दिले व ते जुळवण्यास सांगितले. त्या मुलाने तो नकाशा पाच मिनिटांतच जुळवला. सर्वजण आश्चर्यचकित झाले. मुलगा म्हणाला, “ या नकाशाच्यामागे एक मनुष्याचे चित्र होते. तुकड्यामध्ये विभागलेला माणूस मी जोडला व जग आपोआपच एकत्र आले. ” डावोस व इतर बैठकांना मी जातो . तेव्हा मनुष्य पुन्हा एकत्र कसा होईल, याची चर्चा जागतीक नेत्यांबरोबर करतो. हि चर्चा प्रत्यक्षात अमलात आली तर अजून दोन –तीन पिढ्यांनी साऱ्या विश्वाचाच कायापालट होऊन आपले जग वेगवेअळ्या स्वरुपात आपल्याला पाहावयास मिळेल . स्वतःसाठी नाही तर किमान आपल्या पुढील पिढ्यांसाठी अशा नविन विश्वाला हसतमुखाने सामोरे जाण्याची आपण तयारी केली पाहिजे. झोपेतून जागे होऊन येणाऱ्या उषःकालाचे स्वागत केले पाहिजे…
संदर्भ-एका दिशेचा शोध, लेखक-संदिप वासलेकर, प्रकाशक-राजहंस प्रकाशन, पुणे २०१०
आज देशाची गरज काय आहे ? आजचे जागतिक राजकारण कोणत्या विषयांभोवती फ़िरत आहे…? त्यांचा केंद्रबिंदू काय आहे..? या जगात माणसाचे आणि माणुसकीचे महत्व काय आहे ? हे आपल्याला वरील परिच्छेद वाचल्यावर लक्षात आलेच असेल. असेच अनुभव व निष्कर्ष आपल्यासोबत शेअर केलेले आहेत स्ट्रॅटेजिक फ़ोरसाईट ग्रुपचे संस्थापक आणि एका दिशेचा शोध या पुस्तकाचे लेखक संदीप वासलेकर यांनी. एका दिशेचा शोध या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपले आतापर्यंतचे स्वानुभव आपल्यासाठी खुले करुन दिलेले आहेत .जागतिक राजकारणात भारताला टिकायचे असेल तर कुठ्ल्या धोरणांचा स्विकार केला गेला पाहिजे ? भारत कशा प्रकारे जगाचा रोल मॉडेल ठरु शकतो ? जगात अशी कुठली ताकद आहे जी संपूर्ण विश्वाचे भवितव्य ठरवते ? महासत्ता शब्दाआड जागतिक राजकारण कसे खेळले जाते ? चौथी औद्योगिक क्रांती म्हणजे काय ? का आपला देश आजही मागास आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली याच पुस्तकात… या पुस्तकात आपण कुठे आहोत? आपण कुठे असायला हवं? आपली दिशा कोणती असावी ? या संदर्भात दिशा दर्शन केलेले आहे. त्यामुळे ज्यांच्या समोर माझ्याप्रमाणे प्रश्न निर्माण झालेले आहेत, ज्यांना हे जग आणि आपल्यातले अंतर मोजायची इच्छा आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं.
याविषयी तुम्ही फेसबूकवरही वाचू आणि चर्चा करु शकतात . जर आपल्याला या पुस्तकातील विचार आवडले असतील तर पेज like करायला विसरु नका.
http://www.facebook.com/pages/Eka-Dishecha-Shodh/126104087443744







