मराठी जगत – Marathi Website

Menu

श्रमिक हो, घ्या इथे विश्रांती

मानवतेचे मंदिर माझे, आत लाविल्या ज्ञानज्योती
श्रमिक हो, घ्या इथे विश्रांती !

बंधुत्वाची येथ सावली, अनाथ अमुचे मायमाउली
कधी दिसे का ईश राउळी ? देव ते अंतरात नांदती !

आम्ही लाडके विठुरायाचे, लेणे जरिही दारिद्र्याचे
अभंग ओठी मानवतेचे, मृदुंगी वेदनेस विस्मृती !

दार घराचे सदैव उघडे, भागवताची ध्वजा फडफडे
भावभक्तीचे आम्हा साकडे, पथिक ते परंपरा सांगती !

गीत – रवींद्र भट
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – ते माझे घर (१९६०)

Categories:   मनोरंजन

Comments