मराठी जगत – Marathi Website

Menu

आली ठुमकत, नार लचकत

कुण्या गावाचि, कुण्या नावाचि,
कुण्या राजाचि, तू ग राणी
आली ठुमकत, नार लचकत,
मान मुरडत, हिरव्या रानी

खुळू-खुळू घुंगराच्या, तालावर झाली दंग
शालू बुट्टेदार, लई लई झाला तंग
सोसंना भार, घामाघूम झालं अंग
गोऱ्या रंगाचि, न्याऱ्या ढंगाचि
चोळि भिंगाचि, ऐन्यावानी

डळिंबाचं दाणं तुझ्या, पिळलं ग व्हटावरी
गुलाबाचं फूल तुझ्या, चुरडलं गालावरी
कबूतर येडं खुळं, फिरतया भिरी भिरी
तुझ्या नादानं, झालो बेभान
जीव हैरान, येड्यावानी

कवळ्यात घेऊनीया, अलगद उचलावं
मऊ मऊ हिरवाळीत, धैवरात भिजवावं
पिरतीचं बेन तुझ्या, काळजात रुजवावं
लाडीगोडीनं, पुढल्या ओढीनं
जाउ जोडीनं, राजा-रानी

गीत – जगदीश खेबुडकर
संगीत – राम कदम
स्वर – विष्णू वाघमारे ’वाघ्या’
चित्रपट – पिंजरा (१९७२)

Categories:   मनोरंजन

Comments