मराठी जगत – Marathi Website

Menu

होडीतील दोन प्रवासी

एका शेतकर्‍याच्या दारात सिताफळांचे मोठे झाड होते. त्यास खूप गोड आणि मधुर फळे येत. एके दिवशी त्याने त्यातली काही फळे आपल्या मालकाला नेऊन दिली. त्याला फळे इतकी आवडली की, त्याने लगेच तेथून ते झाड उपटले आणि आपल्या दारात नेऊन लावले.

परंतु, ते झाड नंतर वाळून गेले व त्याला काही गोड, मधुर फळे आली नाहीत.

ही गोष्ट त्या शेतकर्‍याने ऐकली तेव्हा तो म्हणाला, ‘अधाशीपणानं असंच होतं. हे झाड जर इथेच राहिलं असतं तर आम्हा दोघांनाही फळ खायला मिळाली असती.’

तात्पर्य  – जी वस्तु एका जागी फलदायी होते ती इतर ठिकाणी होत नाही.

Categories:   बाल जगत

Comments

Sorry, comments are closed for this item.