मराठी जगत – Marathi Website

Menu

घोडा आणि रानडुक्कर

एक तहानलेला घोडा एका ओढ्यावर पाणी पिण्यास गेला असताना एक रानडुक्कर पाण्यात डुंबत असलेला त्याने पाहिला. तो रानडुक्कर घोड्याला पाणी पिऊं देईना, तेव्हा घोडा चिडला व दोघे भांडू लागले. तेव्हा घोड्याने एका माणसास, रानडुकराला ठार करण्याची विनंती केली. त्या माणसाने हातात शस्त्रे घेतली आणि घोड्यावर बसून तो निघाला. ओढ्याजवळ येताच त्याने रानडुकराला बाण मारून ठार केले. ते पाहून घोड्यास खूप आनंद झाला. परंतु, त्या माणसाने त्यास सोडले नाही. तो म्हणाला, ‘मला तुझा खूपच चांगला उपयोग होईल. तेव्हा मी तुला माझ्या तबेल्यात बांधणार.’ हे ऐकताच एका साध्या गोष्टीसाठी आपण आपले स्वातंत्र्य कायमचे गमावल्याबद्दल घोड्याला वाईट वाटले.

तात्पर्य – दुसर्‍याचा पाडाव करण्यासाठी जेव्हा आपण एखाद्याची गुलामगिरी पत्करतो, तेव्हा आपण कायमचेच गुलाम होतो.

Categories:   बाल जगत

Comments

Sorry, comments are closed for this item.